Apps

E Peek Pahani : सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या |

2024 च्या खरिप हंगामासाठी  ई-पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर  पीक पाहणी करता येणार आहे.

तुम्ही स्वत: तुमच्या शेतातून ई-पीक पाहणी करू शकता. ती कशी, ई-पीक पाहणीचे फायदे काय आहेत? आणि कोणत्या गोष्टीसाठी पीक पाहणी रद्द करण्यात आली आहे? याची सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

ई-पीक पाहणी कशी करायची ?

शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उताऱ्यावर नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलं जातं. गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार हा उपक्रम राबवत आहे.

पिकांची नोंद करण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ई-पीक पाहणी हे अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी प्ले-स्टोअरवर जायचं आहे. तिथं E-Peek Pahani (DCS) असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Install वर क्लिक करायचं आहे.

इस्टॉलेशन कम्प्लिट झालं की ओपन या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ई-पीक पाहणी नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. मग अँप वापरण्यासाठी आवश्यक त्या बाबींना परवानगी द्यायची आहे.

हे पेज उजवीकडे सरकवल्यास अँप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल.

पुन्हा एकदा उजवीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी.

त्यानंतर महसूल विभाग निवडायचा आहे.

मग पुढे शेतकरी म्हणून लॉग-इन करा, या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे विभाग, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे.

आता पहिलं, मधलं किंवा आडनाव, तसंच खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही खातेदार निवडू शकता.

इथं गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून खाली तो क्रमांक टाकायचा आहे आणि मग शोधावर क्लिक करायचं आहे.

मग त्या गटातील खातेदार तुम्हाला निवडायचा आहे. खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासून समोर जायचं आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर सांकेतांक पाठवा (OTP) नावाचं पेज ओपन होईल.

आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे, अशी सूचना तिथं दिलेली असेल. पण, तुम्हाला नंबर बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटण दाबा, मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही गेल्या वर्षी या अॅपवर नोंदणी केली असेल, तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे, तुम्हाला पुढे जायचे का, असा मेसेज तिथं येईल. पण तुम्ही यंदा पहिल्यांदाच नोंदणी करणार असाल तर तसा मेसेज इथं येणार नाही.

आता खातेदाराचं नाव निवडा. मोबाईलवर आलेला OTP टाका आणि पुढे जा.

आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीचं एकूण क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र तिथं आपोआप येईल.

पुढे खरीप हंगाम निवडून, पिकाचा वर्ग जसं की एकच पीक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचं आहे. त्याचा प्रकार, पिकांची नावं आणि क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे.

एकदा का ही माहिती भरून झाली की पुढे जल सिंचनाचे साधन जसं की विहीर, तलाव हे निवडायचं आहे. त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे. मग पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता ज्या गटातल्या पिकांची नोंद करत आहात, त्या गटात उभं राहून पिकांचे दोन फोटो घेणे अनिवार्य आहे.

त्यासाठी छायाचित्र-1 पर्यायावर क्लिक करायचं आहे. पिकाच्या जवळ जाऊन फोटो घ्यायचा आहे. मग त्याचा अक्षांश, रेखांश तिथं येईल.

मग छायाचित्र-2 पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुन्हा पिकाच्या जवळ जाऊन थोडा वेगळ्या अँगलनं फोटो घ्यायचा आहे. त्याचेही अक्षांश, रेखांश तिथं येईल.

खाली असलेल्या बरोबरच्या खुणेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही भरलेली माहिती वाचून घ्यायची आणि खालच्या घोषणेवर टिक करायचं. मग पुढे या पर्यायावर क्लिक करायचं.

पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे, अशी सूचना येईल. ठीक आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

नोंदवलेल्या पिकांची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पाहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.

ही माहिती 48 तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करता येते.

अशाचप्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेली प्रक्रिया तुम्हाला पुन्हा करावी लागेल.

या अॅपवरून तुम्ही कायम पड, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. तसंच गावातील खातेदारांची पीक पाहणीची माहितीही पाहू शकता.

दरम्यान,  ई-पीक पाहणी करताना अॅप व्यवस्थित न चालणे, पिकांची नोंदणी करताना एरर येणे, पीक माहिती नोंदवली तरी ती न दिसणे अशा अडचणी येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

ई-पीक पाहणीचे फायदे काय ?

ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जाते.

MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो.

पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.

पीक विमा योजनेच्या लाभासाठी – पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि  ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.

नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.

ई-पीक पाहणीची अट कशासाठी रद्द ?

राज्य सरकारनं गेल्यावर्षीच्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आणि त्यात सोयाबीन-कापूस नोंद आहे त्यांनाच लाभ मिळेल असं सांगण्यात आलं होतं.

सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.

त्यानंतर मग हे अनुदान देताना ई-पीक पाहणीची अट रद्द करून सात-बाऱ्यावरील नोंदी ग्राह्य धरल्या जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच केली.

त्यामुळे ई-पीक पाहणीची अट केवळ या अनुदानासाठी रद्द करण्यात आलीय. खरिप पिकांच्या नोंदीसाठी मात्र शेतकऱ्यांना पीक पाहणी करावीच लागणार आहे.

Related Posts

ગ્રામ પંચાયત કાર્ય રિપોર્ટ એપ્લિકેશન ૨૦૨૫ : અત્યારે ડાઉનલોડ કરો : Gram Panchayat Work Report App 2025 Download Now

ગ્રામ પંચાયત કાર્ય રિપોર્ટ ૨૦૨૫ ભારતમાં પંચાયત, પંચાયતોને તેમની પાસે ઉપલબ્ધ સંસાધનોનો ઉપયોગ કરીને આર્થિક વિકાસ અને સામાજિક ન્યાય માટે પંચાયત વિકાસ યોજના (PDP) તૈયાર કરવા માટે આદેશ આપવામાં આવ્યો છે. ગ્રામ પંચાયત કાર્ય રિપોર્ટ ઓનલાઈન ચેક કરો | આ એપ્લિકેશન...

Telugu Calendar 2025 : Download Now

పరిచయం తెలుగు క్యాలెండర్ 2025 అనేది తెలుగు సంస్కృతిని ఆధారంగా చేసుకుని రూపొందించిన ఒక వర్షాచరణ క్యాలెండర్ మరియు పంచాంగం. ఇది ఒక అద్భుతమైన సంప్రదాయ పునాది మీద కట్టబడిన సానుకూల మరియు వాస్తవపరమైన వాహిని. పౌరాణికతను, జ్యోతిషాన్ని మరియు ఆధ్యాత్మిక అంశాలను పరిపూర్ణంగా లోపలికి చేర్చుకుంది. ముఖ్య లక్షణాలు తెలుగు క్యాలెండర్ 2025 ఈ...

Download Malayalam Poster Maker App : പോസ്റ്റർ മേക്കർ ആപ്പ് ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക

പല ആളുകൾക്കും പോസ്റ്റർ നിർമ്മിക്കുന്നതിനുള്ള ഡിസൈൻ സോഫ്റ്റ്‌വെയറുകൾ ഉപയോഗിക്കുന്നതിൽ ആത്മവിശ്വാസം ഇല്ല. എന്നാൽ, പോസ്റ്റർ മേക്കർ ആപ്പ് ഉപയോഗിച്ച്, ആർക്കും തങ്ങളുടെ സർഗാത്മകത പുറത്തെടുക്കാനും ആശയങ്ങൾക്ക് ജീവൻ നൽകാനും കഴിയും. ഗുണനിലവാരമുള്ള പോസ്റ്റർ ടെംപ്ലേറ്റുകളുടെ വിശാലമായ ശേഖരവും ലളിതവും വ്യക്തവുമായ ടൂളുകളും ഉപയോഗിച്ച്, നിങ്ങൾക്ക് വിവിധ ഓഡിയോ, വീഡിയോ ഉള്ളടക്കങ്ങൾ ഉപയോഗിച്ച് പോസ്റ്ററുകളും ഫ്ലയറുകളും സൃഷ്ടിക്കാൻ...

India Vs Ireland Women Cricket Match Live Streaming App : Download Now

The growing popularity of women’s cricket has made it essential for fans to have reliable ways to watch matches between teams like India and Ireland. This guide will help you understand the various streaming options available and how to access...

Ration Card eKYC 2025 : Click Here and Complete Your eKYC at Home

Ration Card eKYC 2025 : The government has announced a new update in the ration card. Without completing the eKYC process, ration card holders may experience interruption of their ration benefits. In this article all the information about ration card...

Hindi Panchang Calendar 2025 : Download Now

As the world welcomes a new year, the Hindu Panchang, a captivating calendrical system rooted in millennia of tradition, stands ready to guide devotees through the intricate tapestry of 2025. This remarkable document promises to be a symphony of spiritual...

Download Photomath Best For Maths Learn : ગણિતના કોઈપણ દાખલા સોલ્વ કરો, ફોટોમેથ એપ્લિકેશન શ્રેષ્ઠ

Photomath Best For Maths Learn : ફોટોમેથ વિશ્વભરમાં લાખો શીખનારાઓને ગણિત શીખવા, પ્રેક્ટિસ કરવા અને સમજવામાં મદદ કરવા માટે જાણીતું છે – એક સમયે એક પગલું.સચોટ ઉકેલો અને શિક્ષકો દ્વારા માન્ય વિવિધ પદ્ધતિઓ સાથે પગલું-દર-પગલાં સ્પષ્ટતા મેળવવા માટે ફોટોમેથ એપ્લિકેશન સાથે કોઈપણ...

Download AI Photo APK 2025

The year 2025 has brought forth incredible advancements in artificial intelligence (AI), particularly in photo editing applications. AI Photo APK 2025 is one such revolutionary tool, empowering users to create professional-grade photos with just a few taps. Whether you are...

ਪੰਜਾਬੀ ਕੈਲੰਡਰ 2025 ਡਾਊਨਲੋਡ ਕਰੋ : Download Punjabi Calendar 2025

ਇਹ 2025 ਦਾ ਇੱਕ ਸਭ ਤੋਂ ਚੰਗਾ ਪੰਜਾਬੀ ਕੈਲੰਡਰ ਹੈ। ਤੁਸੀਂ ਕੇਵਲ ਇੱਕ ਕਲਿੱਕ ਨਾਲ ਅੱਜ ਦੀ ਤਿਥੀ, ਤਿਉਹਾਰ, ਜਨਮ ਰਾਸ਼ੀ ਅਤੇ ਛੁੱਟੀਆਂ ਦੇਖ ਸਕਦੇ ਹੋ। 2025 ਦਾ ਪੰਜਾਬੀ ਕੈਲੰਡਰ ਇੱਕ ਆਫਲਾਈਨ ਕੈਲੰਡਰ ਅਤੇ ਸਾਰੇ ਪੰਜਾਬੀ ਬੋਲਣ ਵਾਲੇ ਲੋਕਾਂ ਲਈ...